Wednesday, 18 September 2013

Scientific Spirituality-a challenge to engineers...

   
                                   विज्ञाननिष्ठ आध्यात्म (अघळपघळ??!!)
               

            माझ्या आवडत्या वाकयांन सुरवात करतो , ' विज्ञाननिष्ठ अध्यात्म ज्या एकतत्त्वाचं  
अस्तित्व मानत त्याला स्मरून काही लिहिण्याची इच्छा आहे '.
            अत्यल्प अशा वाचनात 'must read' या प्रवर्गात मोडतील अशी काही पुस्तकं आली.त्यांतील
मुद्द्यांवर अघळ पघळ विचार मांडून एक संदर्भ साहित्य नामावली देत आहे. 
            लोकमत वृत्तपत्रात काही दिवसांपूर्वी विसपुते नावाच्या गृहस्थासंबंदी थोडी माहिति आली होती. ह्या
 अवलियाने म्हणे निरपेक्षवादाचा सिद्धांत मांडला, ज्याची दखल एका विख्यात विदेशी वैयज्ञानिक मासिकाने 
घेतली. यांच्या सिद्धांतानुसार जग हे एकाचवेळी सापेक्ष व निरपेक्ष आहे. सापेक्ष भाग (e=mc2) हा निरपेक्ष
 भागाचं (e=-mc2)प्रतिबिंब आहे.आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामुत संघ नुसार आपण ज्या जगात जगतो ते 
कृष्णाच्या जगाचे प्रतिबिंब आहे. पदार्थ विज्ञानाचे उत्तम ज्ञान असलेल्या  व अध्यात्मिक जीवन जगणाऱ्या ह्या
विसपुतेंच शालेय शिक्षण केवळ ४ थ्या इयेत्येपर्यंत झालेलं होतं .
            १२ जानेवारी २०११ ह्या पवित्र दिवशी अविनाश धर्माधिकारी यांच सी ओ ई पी येथे व्याख्यान ऐकण्याच 
भाग्य लाभलं ! होय, भाग्याचीच गोष्ट ती !! यात सरांनी अध्यात्माला विज्ञाननिष्ठ म्हणत string theory 
व m-theory चा उल्लेख केला. string theory व m-theory १२ मितींच अस्तित्व सिध्द
करतात.सध्या आपण तीन मिती अनुभवू शकतो .म्हणजे उरलेल्या मिती सध्या तरी इंद्रियातीत किंवा इंद्रियगम्य 
ठरतात . ह्या १२ मितिंत ४ थी मिती काळ (time) हि आहे .  ह्या मितीवर अधिराज्य गाजवल्यास time 
machine तयार करणं शक्य आहे .मग सर्व १२ मितींवर इंद्रियातीत अधिराज्य गाजवले तर ? काही प्रश्न 
अनुत्तरीत राहतात ........वरील प्रश्नांसारखी अनेक सामाजीक , राजकीय किंवा वैज्ञानिक प्रश्न मानवी मनाला छळतात . 
(उदा . दरवर्षी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या दिग्विजयसिंह यांना प्रत्येक गोष्टीमागे आर एस एस चाच हात आहे 
अस का वाटत ? ) व  चिंतनात एक वेळ येतेच कि जिथे बौद्धिक मर्यादा जाणवतात .अशावेळी सभ्य किंवा असभ्य 
वैचारिक तडजोडी कराव्या लागतात . माझा असा नम्र दावा आहे कि अध्यात्मिक शिक्षण ह्या प्रश्नांची समाधानकारक
 उत्तरं विना तडजोड देवू शकते .
             आता अध्यात्म विषयी थोडं . अध्यात्म ४ वेदांच्या अभ्यासातून अत्तम समजू शकते . साक्षात्कारी माणसाकडून
  अध्यात्म समजून घेणे फायद्याचे ठरते .अशी साक्षात्कारी माणसं आजदेखील आहेत व भविष्यात देखील असतील . 
अध्यात्म  विषयी टिळक एका ठिकाणी म्हटलेत ,'' ईश्वर प्राप्ती करून घेणे हेच मानवाचे अंतिम ध्येयं असावे .बाकी
 सर्व (स्वराज्या सहित) तात्पुरते ध्येय होत." अध्यात्मिक शिक्षण ईश्वराचे स्वरूप व त्यापर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग
 दाखवते .अध्यात्मात निव्वळ वाचाळतेपेक्षा (जि मी सध्या करतोय !) अनुभव महत्वाचा असतो.अध्यात्म सगुण
  (supreme entity with some form e.g. idol) व निर्गुण (formless 
supreme entity) ईश्वराचे अस्तित्व मानते . ह्या निर्गुण ईश्वराच्या अस्तित्वाची शंका दोन शास्त्रज्ञांना देखील
 एके काळी आलि होती  व ते दोन म्हणजे 1>S.Hawking 2>A.Einstein.नित्य ध्यानातून अध्यात्म संबधी 
अनेक  गोष्टी समजू शकतात. अध्यात्म  जाणून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्याने त्याने ज्याचा त्याचा मार्ग निवडायचा असतो .
केवळ अध्यात्म ज्ञानामुळेच आपण आपलं अस्तित्व ५००० वर्ष जुनं सांगू शकतो .एवढी जूनी केवळ भारतीय संस्कृती आहे . 
अध्यात्मिक तत्वज्ञान हि हिंदुस्थानाने जगाला दिलेली देणगी समजतात व त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा.
विवेकानंद एका ठिकाणी म्हटलेत ''राजकीय समृद्धी हे भारताचे कधीही ध्येयं नव्हते व कधी असणार देखील नाही . अध्यात्मिक 
समृद्धी हेच केवळ आपले अंतिम ध्येय होय .'' 
            अभियांत्रिकीची विध्यार्थी तर्कनिष्ठ (तर्कदुष्ट ??) समजली जातात. अतार्किक गोष्टींना ते जवळ करत नाहीत आणि 
तार्किक गोष्टींबाबत ते बौद्धिक तडजोड करत नाहीत.श्रद्धेची जोड ठेवून केवळ अशाच व्यक्ती अध्यात्म व्यवस्थित समजावून 
घेऊ शकतात. अशी श्रद्धा असेल तरच विवेकानंदांसारख्या महान आत्म्याचा संदेश ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे 'ये हृदयी 
चे ते हृदयी ' जाऊ शकतो.अशी श्रद्धा माझ्यासकट सर्वांना अखंड लाभो हि ईश्वराकडे प्रार्थना करतो व संधार्भासाठी
 साहित्याची एक नामावली देवून थांबतो. ह्या साहित्यातून गेल्यानंतर तुमच्यात अध्यात्माबद्दल सकारात्मक जाऊद्या नकारात्मक 
 जरी  प्रतिकिया निर्माण झाली तरी मी माझ्या स्वार्थी प्रयत्नांना (पक्व किंवा अपरिपक्व )यश आले असे समजेल.  

जय हिंद !!
संधर्भासाठी :
१>रामकृष्ण मठातील विवेकानंद लिखित कोणतेही पुस्तक.
२> "उठा आणि जागे व्हा " - संदिपकुमार सालुंके (IRS,BE MECH from COEP).
३> स्वामी विवेकानंद (ध्वनिफीत) - अविनाश धर्माधिकारी 
४> युथ कॉंन्वेन्षण (ध्वनिफीत , रामकृष्ण मठ पुणे इथे उपलब्ध ) - अविनाश धर्माधिकारी , इंद्रजित देशमुख (स.आयुक्त) 
                                                        आणि इतर.    
                                   विज्ञाननिष्ठ आध्यात्म (अघळपघळ??!!)